Header Ads

Header ADS

भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोल्हापूर दि २४           भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कोविडमहापूर अश्या संकटकाळात लोकांना दिसवरात्र सेवा करणाऱ्या तसेच जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवाना (जुना राजवाडा पोलीस स्टेशनराजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये)आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरनर्सेसआशा सेविकापंचगंगा स्मशान भूमी मध्ये कार्यरत असणारे कर्मचारीस्वच्छता कर्मचारी यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या वेळेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊतअसावरी जुगदारकोमल देसाईसमयश्री कुमारवंदना नाईकवाडे,मधुरा इमानदारनिकिता यादव,शुष्मा गर्देश्वेता कुलकर्णी,स्वाती कदम,लता बर्गेप्राची कुलकर्णीभारती जोशीकिशोरी स्वामी,  वंदना मानेसुनीता सूर्यवंशी आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

No comments