मंत्री वडेट्टीवार यांना भेटून राज्यमंत्री यड्रावकर यांनी मांडल्या शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या व्यथा**नुकसान भरपाईच्या निकषाबाबत सकारात्मक निर्णयाची वडेट्टीवार यांची ग्वाही
मुंबई-
शिरोळ तालुक्यातील पूरबाधित गावांमधील नुकसान भरपाईसाठीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून सुरू आहेत, ज्यांच्या घरात महापुराचे पाणी आले होते अशा परिवाराला सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा राज्य सरकारचा निकष निश्चित आहे, परंतु तालुक्यातील जी गावे महापुराच्या पाण्याने संपूर्ण वेढली गेली होती प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या या गावांमधील ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते, महापुराने वेढलेल्या अशा सर्व गावांना आणि त्या गावातील प्रत्येक परिवाराला सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंगळवारी भेट घेऊन केली, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली,
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या अनेक मागण्यांबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांना निवेदन देऊन माहिती दिली, 2019 च्या महापुरानंतर नुकसानीचे पंचनामे होऊन महाविकास आघाडी सरकारने पुरग्रस्तांना चांगली मदत केली होती परंतु काही चुकीच्या निकषामुळे अनेक नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागले होते, यामध्ये शेतकऱ्यांचे विद्युत मोटारी व संच, शेडनेट, ठिबक सिंचन पाईप्स व ग्रीन हाउस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती, सहकारी संस्था व खाजगी मालकीच्या गोडाऊन मधील खत साठ्यांचे व औषधांचे नुकसान होऊन देखील त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे 2019 मध्ये नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या या सर्व घटकांना या वेळी नुकसान भरपाई मिळावी असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिले, शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत असतो 2019 च्या महापुरानंतर कुकुटपालन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते, पण चुकीच्या निकषामुळे या व्यवसायिकांना तुटपुंजी मदत मिळाली होती, पंचनामे करताना यावेळी कुकूटपालन व्यवसाय संबंधीचे नुकसान भरपाई बाबतचे असलेले निकष बदलावेत असा आग्रह आपण मंत्री वडेट्टीवार यांच्या कडे केला असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील पुरबाधित जनतेला दिलासा देताना मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरबाधितांसाठी
अकरा हजार पाचशे कोटीचे पॅकेज जाहीर केले याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी शेवटी आभार मानले.
No comments