महापालिकेकडे लसीचा पुरेसासाठा18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी ऑनलाईन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे
कोल्हापूर ता.08 : महापालिकेकडे सर्व वयोगटासाठी पुरेसा लसीचा साठा उपलब्ध आहे. 45 ते 59 वर्षापर्यंत 61 टक्के नागरीकांचा पहिला डोस पुर्ण झालेले आहे तर दुसरा डोस 72 टक्के पुर्ण झालेला आहे. 60 वर्षावरील नागरीकांचा पहिला डोस 84 टक्के असून दुसरा डोस 68 टक्के पुर्ण झालेला आहे. परंतू 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचा आजअखेर 25 टक्के पहिला डोस व दुसरा डोस 16 टक्के झालेला आहे. महापालिकेकडे पुरेसा लसीचासाठा उपलबध असूनही गेल्या चार दिवसात ऑनलाईन रजिस्टेशनचे स्लॉट रिकामे रहात आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी ऑनलाईन रजिस्टेशन करुन लसीकरण करुन घ्यावे. जेणे करुन आपल्या कुटुंबाचे व आपल्या शहराचे कोवीड पासून संरक्षण करता येईल. यासाठी महापालिकेच्यावतीने 18 ते 44 वयोगटातील नागरीकांसाठी शनिवार, दि.11 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजलेपासून सोमवार, दि.13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2021 अखेर सहा दिवसासाठी ऑनलाईन रजिस्टेशनसाठी स्लॉट खुले केले जाणार आहेत. या कालावधीत 18 ते 44 वयोगटातील नागरीकांनी जास्तीत जास्त रजिस्टेशन करुन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
No comments