Header Ads

Header ADS

राधानगरी धरणातून 5684 क्युसेक विसर्गजिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली

 कोल्हापूर, दि. 13 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.90 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 3, 5 व 6 खुला आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सांडव्यातून 4284 असा एकूण 5684 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-236-90, तुळशी -97.72, वारणा -972.83, दूधगंगा-712.34, कासारी- 76.47, कडवी -71.24, कुंभी-75.98, पाटगाव 105.24, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -44.170, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

 तर, बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.8, फूट, सुर्वे- 27.4, रुई 56.9, इचलकरंजी 53, तेरवाड 45.8, शिरोळ -37.6  तर नृसिंहवाडी 35.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 19 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वाळोली, बाजारभोगाव आणि कुंभी नदीवरील शेणवडे या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

No comments