राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग जिल्ह्यातील 4 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर, दि. 18 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 231.24 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-231.24, तुळशी -98.01, वारणा -972.83, दूधगंगा-719.12, कासारी- 77.52, कडवी -71.24, कुंभी-75.10, पाटगाव 104.70, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -41.190, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 15.2, फूट, सुर्वे- 17.11, रुई 43.9, इचलकरंजी 40.6, तेरवाड 39, शिरोळ -31 तर नृसिंहवाडी 31 फूट इतकी पाणी पातळी आहे.
जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 4 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील – रूई व इचलकरंजी, भोगावती नदीवरील- खडक कोगे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 4 बंधारे पाण्याखाली आहेत.
No comments