Header Ads

Header ADS

नदी प्रदूषणमुक्त करणे काळाची गरज. जिल्हा परिषद सदस्या शिल्पा पाटील

         *बालिंगा  /प्रतिनिधी*.
     कोरोना आजार आणि आलेला महापूर याची तीव्रता आपण जवळून पाहिली आहे. यासाठी सर्वांनी आज संकल्प करूया आपल्या गावातून जाणारी नदी, ओढे, नाले, विहिरी आदी प्रदूषणापासून रोखण्याचा असे मत जिल्हा परिषद सदस्या शिल्पा चेतन पाटील. ( सडोली दुमाला )  यांनी व्यक्त केले.                                सडोली दुमाला. ता. करवीर. येथे निर्माल्य व मूर्तीदान जमा कार्यक्रम प्रसंगी महिलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
      शिल्पा पाटील. पुढे म्हणाल्या शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती, निर्माल्य जमा  कार्यक्रम प्रसंगी त्यांनी सर्व महिलांना प्रदूषण कसं वाढत आणि याला आपण कस जबाबदार आहोत. याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
   सर्वच महिलांनी आपली गवर, शंकूरबा, गणोबा  जि. प. सदस्या शिल्पा पाटील. यांच्या हस्ते जमा करण्यात आले. एकंदरीत आज मितीला गरज आहे.समाज प्रभोदनाची प्रदूषण मुक्त नदी करण्याची आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी गावोगावी वृक्षारोपण करण्याची असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी राबवत असलेल्या गणेश मूर्ती, व निर्माल्य दान उपक्रमाचे जिल्हा परिषदेच्या वतीने कौतुक केले.

No comments