महावितरण कडून कर वसुली करावी जिल्हा परिषदेच्या सुचना*.... कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत ठराव मंजूर
बालिंगा /प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि कर वसुलीचे अधिकार ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील 129 नुसार ग्रामपंचायतीस आहेत.
याबाबत जिल्हा परिषद कोल्हापूर येथील स्थायी समिती सभा दिनांक 17/08/2021 रोजी घेण्यात आली होती, या सभेत ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ट्रान्सफॉर्मर,उच्च दाबाचे विधुत वितरण वाहिन्यांचे टॉवर, विधुत पोल,सबसेन्टर्स आदीवर ग्रामपंचायती मार्फत कर आकारणी करावी याबाबतस्थायी सभेत चर्चा होऊन कर आकारणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.तसेच सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कर आकारणी करण्याच्या सूचना द्याव्यात असे जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव.यांनी सर्व गटविकास अधिकारी यांचेकडून कळविण्यात आले आहे.
No comments