Header Ads

Header ADS

कोरोनाला कायमचे हद्दपार करायचे असेल तर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा......संदीप कोळेकर


     *बालिंगा / प्रतिनिधी*.
 कोरोना आजाराने संपूर्ण राज्यात थैमान घातल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.याची सर्वानी जाणीव ठेऊन  कोरोना आजार हद्दपार करून सन 2022 चा गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी  गणरायाला साकड घालुया. अशी पोलिस प्रशासनाच्या वतीने विनंती करून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने  साजरा करण्याचे आवाहन करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर.यानी केले. 
        नागदेववाडी.येथील   वसंत हरी मंगल  कार्यालयातआयोजित केलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत ते बोलत होते.  या  बैठकीसाठी बालिंगा, नागदेववाडी, पाडळी खुर्द, दोनवडे, फुलेवाडी  क्रांतिसिंह नाना पाटील नगर, जीवबा नाना पार्क, आदी भागातील 100 ते 120 मंडळानी हजेरी लावली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बालिंगा युवा सरपंच मयूर जांभळे.हे होते .
   सदरची बैठक पाडळी खुर्द व बालिंगा  या गावच्या पोलिस पाटील अर्चना पाटील  ,शिंगणापूर गावचे सरपंच प्रकाश रोटे. रिंगरोड फुलेवाडी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रिंकू  देसाई.यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. 
    बालिंगा सरपंच मयूर जांभळे यांनी  कोरोना आजाराची तीव्रता लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव पोलिस प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करून ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्याना सोबत घेऊन निर्विघ्नपणे पार पाडू अशी ग्वाही दिली.
    शिंगणापूर सरपंच प्रकाश रोटे.यानी कोरोना आजारा मुळे सर्वच थराचे झालेले नुकसान याची जाणीव करून दिली आणि सर्वानी गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून  साजरा करावा असे आवाहन केले.
 पोलिस पाटील अर्चना पाटील.यानी करवीर पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर.यानी दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे सांगून लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना का आमलात आणली याची माहिती देऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून करवीर तालुक्यात आदर्श निर्माण करूया असे त्या म्हणाल्या.
             सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई.यानी संदीप कोळेकर  यानी बैठकीत दिलेल्या माहितीची  सर्व मंडळाना आठवण करून देत.कोरोना समूळ नष्ट करण्यास सर्वांची  मदत मोलाची आहे.यासाठी करवीर पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सर्व मंडळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतील असे यावेळी सांगितले.
 या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य धनंजय ढेंगे, विजय टायशेटे, नंदकुमार जांभळे,नंदकुमार गाडे,उत्तम गायकवाड, अमृत दिवसे, विजय जांभळे, बालिंगा ग्रामपंचायत क्लार्क संतोष जाधव आदिसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार क्लार्क संतोष जाधव. यांनी मानले.
 *कायदा आणि सुव्यवस्था  अबाधित ठेवणार.. मयूर जांभळे*.
 करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी गणेशोत्सव कसा साजरा करावा. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच मयूर जांभळे. यांनी बालिंगा गावातील मंडळाची आकडेवारी सांगून बालिंगा गावात गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन नक्की पार पाडू अशी ग्वाही बालिंगा गावच्या वतीने दिली.

No comments