बालिंगा अशुध्द जल उपसा केंद्राकडील पंपाची डिलीव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडणेचे काम गुरूवारी करण्यात येणार असलेने बालिंगा व नागदेववाडी अशुध्द व शुध्द जल उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद
कोल्हापूर 21: बालिंगा अशुध्द जल उपसा केंद्राकडील नवीन बसविण्यात आलेल्या 300 एचपी व्हर्टीकल टर्बाईन पंपाची डिलीव्हरी लाईन मेन रायझिंग लाईनला जोडणेचे काम गुरूवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी बालिंगा व नागदेववाडी अशुध्द/शुध्द जल उपसा केंद्राकडील पाणी उपसा बंद रहाणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणा-या ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी वसाहत परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक परिसर आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर,चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भाग इत्यादी भागात तसेच सी डी वॉर्ड दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर,महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर इत्यादी परिसरात व ई वॉर्ड खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागामध्ये दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. गुरुवारी लाईन रिकामी असलेने शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी या भागामध्ये अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments