मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कोल्हापूर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत या वर्षी 1 ली ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृतीची योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.
शिष्यवृत्तीच्या योजनेची माहिती याप्रमाणे-
अ.क्र | योजनेचे नाव | जात | वर्ग/ इयत्ता | आवश्यक कागदपत्रे |
1 | मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती | विजाभज | 1 ली ते 10 वी | 1.बॅक पासबुक छायांकित प्रत 2.2020-21 चा पालकांचा उत्पनाचा दाखला (अनु जाती व विजाभज साठी रु 2 लाख / इमाव साठी 2 लाख ) 3.विद्यार्थ्यांचा स्वत:चा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला. |
इ.मा.व | 1 ली ते 10 वी | |||
अनु. जाती | 9 वी व 10 वी | |||
2 | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (फक्त मुली) | इमाव, विजाभज, विमाप्र, अनु जाती | इ.5वी ते 7 वी व इ.8वी ते 10 वी | 1) बॅक पासबुक छायांकित प्रत |
3 | 10 वी परीक्षा फी | अनु जाती विजाभज, विमाप्र, | इ. 10 वी | 1) बॅक पासबुक छायांकित प्रत
|
4 | गुणवत्ता शिष्यवृत्ती | अनु. जाती विजाभज, विमाप्र, | इ.5वी ते 7 वी व इ.8वी ते 10 वी | 1) बॅक पासबुक छायांकित प्रत 2) मागील परीक्षेचे गुणपत्रक |
5 | अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती | सर्व जाती / धर्म |
| 1) बॅक पासबुक छायांकित प्रत 2) कातडी कमावणे,सोलणे, सफाईकाम, कागद, काच, पत्रा गोळा करणे या पैकी एक काम करत असलेबाबत आयुक्त / मुख्याधिकारी/ ग्रामसेवक यांचा दाखला 3) वसतीगृहात राहत असलेबाबत वसतीगृ प्रमुखचा दाखला. |
या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या माहितीसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर कार्यालयाच्यावतीने तालुक्यात घेण्यात येणा-या कॅंम्पच्या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहनही समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.
0000000
No comments