Header Ads

Header ADS

*प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड यादीतील पात्र-अपात्र शोध सर्वे करण्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचा आदरपूर्वक नकार*



*बालिंगा / प्रतिनिधी*.
        केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशानुसार प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड पात्र-अपात्र कामाचे तात्काळ निवड करण्याचे आदेश दिले आहे सदर आदेशानुसार सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर काम तात्काळ ग्रामसेवक यांनी पूर्ण करण्याचे आदेश व सूचना दिलेल्या आहेत यापूर्वीच्या सूचना व आदेशा नुसार ग्रामीण भागात आवास योजनेचे प्राथमिक काम ग्रामसभा बोलावून  लाभार्थी निवड करणे, सदर यादी पंचायत समितीकडे सादर करणे ,यादी ऑनलाईन करणे, आधार लिंकिंग काम पूर्ण करणे आदी सर्व कामे ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक संवर्ग आणि शंभर टक्के पूर्ण केलेले आहे 
सर्व प्रक्रियेनंतर आता नव्याने पात्र अपात्र लाभार्थी निवड ग्रामसेवक यांनी करावे हे आम्हाला मान्य नाही 
कारण योजना अंमलबजावणी करणारी यंत्रणा ग्रामसेवक  असल्यामुळे सदर काम आमच्याकडून करण्यात येऊ नये अन्य पर्यायी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था ,कर्मचारी अधिकारी यांचा समन्वय घेऊन 
सन 2016 मध्ये कमिटी द्वारे काम करणे बाबत आदेशित केलेले आहे
 या सर्व पर्यायाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना याद्या पात्र-अपात्र निवड करावी या कामासंदर्भात ग्रामसेवक सवर्गाला सक्ती करण्यात येऊ नये. तसेच त्यांच्याकडून सदर काम काढून घेण्यात यावे ही विनंती आहे यासंदर्भात निवेदन ना.  हसन मुश्रीफ  (मंत्री ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई) 
यांना दिनांक 25 ऑगस्ट 20 21 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन इ 136 चे राज्य अध्यक्ष  एकनाथ रावजी ढाकणे व राज्य सरचिटणीस  प्रशांत जामोदे तसेच कोषाध्यक्ष संजीव निकम यांनी दिले आहे.संघटनेच्या म्हणण्यानुसार याद्या ग्रामसभा निवड करताना पात्र-अपात्र निकस व सचिव यांचे मत नोंदवून सुद्धा काही अपात्र लाभार्थी यादीमध्ये समावेश आलेले काही ठिकाणी दिसून येत आहे आणि गाव पातळीवर अंमलबजावणी ग्रामसेवक करत असल्यामुळे आणि आज राज्यात हजारो ग्रामपंचायत व प्रशासक असल्याकारणामुळे सदर काम इतर एजन्सीमार्फत व्हावे
 असे राज्यातील ग्रामसेवक  संवर्गाची व संघटनेची मागणी आहे आज ग्रामसेवक संवर्ग कडे प्रचंड अतिरिक्त कामे ,विविध विभागाच्या योजना. अभियाने गाव पातळीवरील कोरोना व साथरोग प्रतिबंधक उपाय योजना. विविध विकास कामे आहेत 
या सर्व बाबींमुळे ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावाखाली असून प्रपत्र ड च्या याद्या सर्वेक्षण हे काम ग्रामसेवक सवर्गाकडे दिल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही गावातील अपात्र लाभार्थी ग्रामसेवका बरोबर वाद घालणार तसेच स्थानिक राजकारण यामध्ये घुसेल यामुळे ग्रामसेवक संवर्गाची सेवा व जीव धोक्यात येऊ शकते
 ग्रामसेवक सुद्धा मनुष्य आहे त्यांच्याकडील कामाचा ताण विचारात घेता सदर कामासाठी दुसरी यंत्रणा कार्यान्वित करून पूर्ण करावी
 अशी मागणी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे व शासनाचे प्रपत्र ड सर्वेक्षण काम आदरपूर्वक नकार कळवत आहे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई 136 च्या वतीने राज्याध्यक्ष  एकनाथराव ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी राज्य शासनास दिले आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई.136 चे जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार. व जिल्हा सरचिटणीस के. टी. सिताप. यांनी दिली.

No comments