Header Ads

Header ADS

शिवराज नाईकवाडे साहेब यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर सचिवपदी नियुकती

 



शिवराज नाईकवाडे साहेब यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर  सचिवपदी विधी व न्याय खाते महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच नेमणूक केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आदरणीय नाईकवाडे साहेब यांनी गेली सोळा वर्ष सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय उस्मानाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर येथे अधीक्षक पदावर अतिशय जबाबदारीने काम पाहिलेले आहे. त्यांचा सेवा कालावधी व अनुभव विचारात घेऊन शासनाने  त्यांचेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव पदी नेमणूक केलेली आहे.
एकंदरीत नाईकवाडे साहेबांनी सेवेमध्ये आत्तापर्यंत दिलेले योगदान कार्यतत्परता धडाडी तसेच लोकाभिमुख सेवा  इत्यादी गोष्टीचा विचार करता निश्चितच त्यांची झालेली निवड योग्य असल्याचे दिसून येते. आतापर्यंत सेवेमध्ये दिलेले योगदान तसेच माजी महापौर कै. बंडोपंत नाईकवाडे साहेब यांचेकडून लाभलेला कौटुंबिक व राजकीय वारसा, संस्कार,सेवाभावी वृत्ती तसेच समाजाचा विकास केंद्रबिंदू मानून आत्तापर्यंत कार्यतत्पर व कार्यमग्न असल्याने त्याची निवड खरोखरच योग्य असल्याचे त्यांचे निवडीवरून स्पष्ट होते.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी सतत झटणारे त्याच्या हक्कांसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणारे त्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणारे नाईकवाडे सो खरोखरच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.
श्री नाईकवाडे साहेब यांच्या सचिवपदी झालेल्या नेमणुकी मुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी शासनाने सोपवलेले आहे संघर्षाचा पिंड असल्याने सदरची जबाबदारी देखील ते लीलया पार पडतील यात शंकाच नाही.
आई वडिलांची पुण्याई आणि आशीर्वाद यांच्या बळावर खरोखरच आई महालक्ष्मी अंबाबाईने तिच्या सेवेसाठी श्री नाईकवाडे साहेब यांची निवड केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

आपल्या हातून इथूनपुढे सुद्धा राष्ट्रहिताची कामे घडोत याच मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

No comments