शंकर पोवार यांना अध्यात्मातून सामाजिक विकास विषयाची पी. एच. डी. प्राप्त
बालिंगा / प्रतिनिधी
जीवन आधार फॉउंडेशन, रेस्क्यू फोर्स ( भारत देश ) संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पोवार. यांनी आपलं उभं आयुष्य सामाजिक सेवा करण्यासाठी अर्पण केले आहे.शंकर पोवार.यांनी जीवन आधार फॉउंडेशनच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम केलं आहे.पोवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अध्यात्मातून सामाजिक विकास या विषयाची पी. एच. डी. पूर्ण करून या परीक्षेत गोल्ड मिळविले आहे.याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कोरोना काळात तसेच महापुराच्या काळात जीवन आधार फॉउंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थीपणे काम केले आहे. सर्वसामान्य जनता संकटात असताना जीवन आधार फॉउंडेशन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि आहे.असे ते म्हणाले. शंकर पोवार यांनी पी. एच. डी. प्राप्त केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होतं आहे.
No comments