वन्यजीव सप्ताहामध्ये व्याघ्र संवर्धनाविषयी जनजागृती
कोल्हापूर, दि. 30 : दिनांक 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताह संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या वर्षी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून Joining India's Tiger Dots India for Tigers Rally on Wheels हा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1973 मध्ये प्रथम स्थापन झालेल्या मानस, सिमलिपाल, पलमाऊ, कॉर्बेट, मेळघाट, बंदिपूर, कान्हा, रणथंबोर, सुंदरबन या 9 व्याघ्र प्रकल्पामध्ये भव्य कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या 9 व्याघ्र प्रकल्पांच्या भौगोलिकदृष्ट्या जवळ असणारे व्याघ्र प्रकल्प रॅलीद्वारे तेथे पोहोचून आयोजनात सहभागी होणार आहेत.
भारतास स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) दिल्ली मार्फत भारतातील सर्व 51 व्याघ्र प्रकल्पात देखील Synchronized Patrol drive (संयुक्त गस्ती) व Awareness outreach in schools (शाळांमध्ये जनजागृती) असे उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत.
व्याघ्र प्रकल्प रॅली दरम्यान लागणारी गावे, शहरे व शाळांमध्ये व्याघ्र व संवर्धन विषयी लोक व विद्यार्थ्यांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच वन्यजीव संवर्धनात भरीव योगदान दिलेले वन कर्मचारी, वन शहिदांचे नातलगांचा उचित सन्मान केला जाणार आहे. तसेच व्याघ्रगीते, पथनाट्य, Signature drive for Tiger conservation असे अभिनव उपक्रम राबवले जाणार आहेत.
सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य यांचे मध्यवर्ती असलेल्या कोयनानगर येथून NTCA फ्लॅग सोबत रॅलीची सुरूवात होऊन कराड, कोल्हापूर, बेळगाव मार्गे स्थानिक लोकप्रतिनिधी, व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी / कर्मचारी, स्थानिक लोक, विद्यार्थी, पश्चिम घाटातील नव्याने घोषित झालेल्या जोर-जांभळी, पन्हाळा-विशाळगड, गगनबावडा, आंबोली, तिलारी संवर्धन क्षेत्रातील वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत जनजागृती व प्रसिद्धी करत रॅलीचा कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प येथे पहिला टप्पा पूर्ण होईल. तेथून भद्रा व्याघ्र प्रकल्प येथे पोहोचून शेवटी बंदिपूर व्याघ्र प्रकल्प कर्नाटक येथे संपन्न होणार आहे. लोकांमध्ये व विशेषत: मुलांमध्ये व्याघ्र व वन्य जीवांविषयी आस्था निर्माण करणे व व्याघ्र वन्यजीव संवर्धनामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश असणार आहे. या रॅलीबरोबरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 5 परिक्षेत्रांमध्ये बफर व आसपासच्या गावांमध्ये वन्यजीव सप्ताहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
0000000
No comments