Header Ads

Header ADS

नियमितपणे कचरा संकलन करण्याकरिता दोन सत्रात टिपरद्वारे कचरा संकलनाचे नियोजन


कोल्हापूर ता. 23 : प्रभागातील कचरा पुर्ण क्षमतेने उठावासाठी महापालिकेने दोन सत्रात संकलनाचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी सकाळी 10.00 ते 2.00 व दुपारी 2.00 ते 10.00 या सत्रात ॲटो टिपरद्वारे कचरा संकलन करण्यात येणार आहे.

शहरामध्ये दैनंदिनपणे निर्माण होणारा कचरा संकलन करणेकरिता 104 ॲटो टिपर वाहने आहेत. या 104 ॲटो टिपर वाहनांद्वारे सकाळी 6.00 ते 2.00 या सत्रात कचरा संकलन करण्यात येतो. काही प्रभागामध्ये 2 ॲटो टिपर वाहनांद्वारे पुर्ण क्षमतेने कचरा संकलन करण्यात येत आहे तर काही प्रभागामध्ये एकच टिपर असलेमुळे घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. घंटागाडीद्वारे संकलन करण्यात येणारा कचरा कंटेनरमध्ये टाकण्यात येतो़. सद्यस्थितीमध्ये बरेच कचरा कंटेनर खराब झालेले आहेत. तसेच आर.सी. वाहनेही वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसापासून शहरात कचरा उठावाची समस्या निर्माण झालेली आहे. याबाबत उपाययोजना म्हणून नियमितपणे कचरा संकलन करण्याकरीता सकाळी 10.00 ते 2.00 व दुपारी 2.00 ते 10.00 सत्रात टिपरद्वारे कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. दुपारी 2.00 ते 10.00 या सत्रात के.एम.टी विभागाकडील 50 वाहनचालक या गाडीवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. दैनंदिनपणे पुर्ण क्षमतेने महापालिकेच्यावतीने घराघरातून कचरा संकलन केल्यास कंटेनरमध्ये नागरिकांकडून कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

महापालिकेच्यावतीने नविन 65 ॲटो टिपर खरेदीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर सकाळ सत्रामध्ये सर्व प्रभागामध्ये नियमितपणे ॲटो टिपर वाहने उपलब्ध होणार आहेत. ॲटो टिपरद्वारे 100 टक्के कचरा संकलन सुरु झालेनंतर शहरातील उर्वरीत सर्व कंटेनर काढण्याचे नियोजन आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी सकाळ किंवा  दुपार सत्रात उपलब्ध होणाऱ्या ॲटो टिपर वाहनांकडे कचरा द्यावा. ॲटो टिपर वाहन उपलब्ध न झालेस किंवा कचऱ्यासंबंधी काही तक्रार असलेस वॉर्ड ए,बी,सी,डी यांनी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर (9766532040), ई वॉर्डसाठी निखिल पाडळकर (9766532038) व आरोग्य विभाग 0231-2540290 वर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments