आईच्या स्मृतिदिनानिमित्य आई. वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून राजेंद्र साळोखे यांनी दिले शैक्षणिक कार्याला बळ* "" *187 विध्यार्थ्यांना साहित्याचे वाटप*.
*बालिंगा / प्रतिनिधी*.
आईच्या स्मृतिदिनानिमित्य आई, वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना सडोली (खालसा) (ता.करवीर) येथील राजेंद्र मारुतराव साळोखे यांनी स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य वाटप करून आपल्या आईच्या स्मृर्ति चिरतंन ठेवून शैक्षणिक कार्याला बळ दिल्याने साळोखे यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजात कोट्यावधी संपत्ती असणारे अनेक लोक आहेत. पंरतु समाजातील गरजूंना मदत करण्याचे धाडस कधी करत नसतात. परंतु कै.ग.बा.पवार पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,घानवडे या शाळेत लिपिक पदावर काम करणारे व माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्याकडून सामाजिक कार्याची शिकवण घेतलेले सडोली (खालसा)(ता.करवीर) येथील राजेंद्र साळोखे यांनी आपल्या मातोश्री कै. रत्नाबाई मारुतराव साळोखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोरोनाने किंवा अन्य कारणाने ज्यांचे आई, वडील किंवा दोघेही मयत झाले आहेत. अशा करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील १८७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच या त्यांच्या मदतीने त्या कुटुंबासह शैक्षणिक क्षेत्राला बळ मिळाले आहे. राजेंद्र साळोखे यांना कुटुंबातील भाऊ अनिल साळोखे, कृष्णात साळोखे व बहिण सौ.शकुंतला मानसिंग पाटील यांचे पाठबळ मिळाले असून या सामाजिक कार्यात त्यांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. आई, किंवा वडील मयत झाल्यानंतर समाजातील कोणीही त्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागत आहे. म्हाळुंगे (ता.करवीर) येथील एका विद्यार्थ्यानीला हे शैक्षणिक साहित्य भेट देत असताना आपल्या मयत झालेल्या वडिलांची आठवण आल्यानंतर तिचे अश्रू अनावर झाले होते.
*चौकट*
समाजाचे आपण काही तरी देणे आहे या भावनेतून प्रत्येक महिन्यांच्या पगारातून काही रक्कम समाज कार्यासाठी ठेऊन अशा करवीर तालुक्यातील आई, वडीलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणार आहे. *राजेंद्र साळोखे सडोली (खालसा) ता. करवीर* फोटो ओळ
म्हाळूंगे ता.करवीर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी राजेंद्र साळोखे, मानसिंग पाटील, सचिन ठाकर, संग्राम पाटील, सागर पाटील, अभिजीत पाटील, संदिप चौगले, एस.बी.जाधव सर, सी.डी.पाटील सर व सुनिल भोसले व इतर उपस्थित होते
No comments