Header Ads

Header ADS

केदारलिंग दूध संस्थेतर्फे दिपावलीनिमित्तभेटवस्तू व दूध फरक वाटप



सभासदांना डिव्हीडंड, ठेव व ठेव व्याज, दूध दर फरक व दिपावली भेट वस्तू वाटप संस्थेचे अध्यक्ष जयसिंग कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत अन्य मान्यवर.


दोनवडे ः  दोनवडे (ता. करवीर) येथील केदारलिंग सहकारी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना डिव्हीडंड, ठेव व ठेव व्याज, दूध दर फरक व दिपावली भेट वस्तू वाटप संस्थेचे अध्यक्ष जयसिंग कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
डिव्हीडंड 12 टक्के - 75 हजार, ठेव व ठेव व्याज 10 टक्के - 3 लाख 52 हजार, म्हैस दूध दर फरक 19 टक्के - 5 लाख 24 हजार, गाय दूध दर फरक 15 टक्के - 5 लाख 53 हजार, भेट वस्तू - 1 लाख 45 हजार असे एकूण 16 लाख 49 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष पार्वती रेणके, संचालक अशोक पाटील, बाळू पाटील,  परशराम पाटील, राजाराम शिंदे, तुकाराम मगदूम, कृष्णात पोवाळकर, राजाराम कदम, तुळसाबाई पोवाळकर, आक्काताई पाटील उपस्थित होते.

No comments