Header Ads

Header ADS

जीवन आधार फॉउंडेशन कडून निराधारांना आधार


बालिंगा / प्रतिनिधी
             देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे सर्व नात्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली पण या निष्पाप, निराधार,एड्स ग्रस्त अनाथाना नवजीवन देण्यासाठी करवीर तालुक्यातील शिये येथे करुणालय बालग्रहाची स्थापना  झाली.आणि अनाथाना आधारा बरोबरच  हक्काचं घर मिळालं आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून या अनाथांना दिपावलीच्या पूर्व संध्येला जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश. या संस्थेकडून जीवनावश्यक वस्तू साहित्य वाटप करण्यात आले. या दरम्यान करुणालय संस्थेचे संस्थापक यांच्या बरोबर काही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तेथील मुलांच्या
शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक इ. क्षेत्रातील समस्या, नोकरीविषयक अडचणी, भविष्यात केला जाणारा  उदरनिर्वाह, आवश्यक असे सर्व साहित्य तसेच मुलांना भविष्यात उद्भवणार्या अडचणी या बाबत सर्व गोष्टी जाणून घेतल्या  तसेच शासकीय अनेक योजना अशा  मुलांना मिळवून देण्यासाठी जीवन आधार तत्पर आहे अशी  ग्वाही देण्यात आली . तसेच फुटपाथ व रस्त्यावरील अपंग असणाऱ्या व्यक्तीना कपडे वाटप करण्यात आलीत.यावेळी महिला राज्य उपाध्यक्षा डॉ सौ शोभा महाजन,महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष युवराज पोवार ,महाराष्ट्र राज्य युवक सचिव अरविंद कांबळे ,कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे, करवीर तालुका युवक अध्यक्ष प्रथमेश वाडकर ,भुदरगड तालुका युवक अध्यक्ष विवेक पोवार, रेस्क्यु जवान ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते ...

No comments