Header Ads

Header ADS

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातीलवाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


            ·         प्रत्येक शहरांत वाहनतळचेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश

 

            मुंबई दि 18कोविडमूळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ट्रकटेम्पोटँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

             यावेळी खासदारज्येष्ठ नेते शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारपरिवहन मंत्री ॲङ अनिल परबगृह मंत्री दिलीप-वळसे पाटीलपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेपोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती . 

            राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. 

            कोविडमुळे वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे वार्षिक मोटार वाहन करात सूट मिळणेव्यवसाय करात सूट मिळणेशाळा व धार्मिक स्थळांच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोटार कर पूर्ण माफ करणेराज्यभरात वाहने व बसेस थांबण्याकरिता पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे,  कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसचे कर कमी करणेजड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत 10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणेकालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द कराव्यातसार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करणेअशा मागण्या महासंघाने केल्या. 

            वित्त व परिवहनपोलीस यांच्यासमवेत त्या मागण्यांसंदर्भात योग्य तो तोडगा काढण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. 

            या बैठकीस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धनउपाध्यक्ष महेंद्र लूलेसरचिटणीस दयानंद नाटेकर उपस्थित होते.

No comments