Header Ads

Header ADS

देशाच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत*. डॉ. रवि शिवदास तब्बल दिड वर्षांनी चिमुकल्यांनी शाळा गजबजल्या


            *बालिंगा / प्रतिनिधी*.

सम्पूर्ण महाराष्ट्रात कोरोना आजाराने थैमान घातल्याने गेली दिड वर्षे शाळा   (ज्ञान मंदिर) बंद ठेवण्यात आली होती.शासनाने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धत अवलंबवली होती. विद्यार्थी शालेय जीवनाशी एकरूप ठेवण्याचं काम शासनाने दिड वर्षे केलं. सर्वांनी  योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे आता कोरोना आजार हद्दपार झाला आहे. आणि कोरोना विरुद्ध नागरिक हा लढा आपण जिंकलो आहे.आता शिक्षकांची जबाबदारी वाढली असून देशाचं भविष्य या मुलांच्या हातात आहे. यासाठी आदर्शवत विध्यार्थी घडविण्यावर भर द्यावा असे गौर उदगार जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास. यांनी काढले. बालिंगा. ता. करवीर. येथील प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत करून सर्व विध्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालिंगा गावचे सरपंच मयूर जांभळे होते. करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर जांभळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग वाडकर, शालेय व्यवस्थापनअध्यक्ष शिवाजी जांभळे. यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक हजर होते.
     एकंदरीत आज शाळेचा पहिला दिवस नवे मित्र, नवा वर्ग, गेली दिड वर्षे कोरोना आजारामुळे शिक्षक आणि विध्यार्थ्यांची झालेली विभागणी आज एकत्र येणार  यामुळे सर्वच विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

No comments