Header Ads

Header ADS

राज्यात सप्टेंबरमध्ये १७ हजार १५० बेरोजगारांना रोजगार - कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती



            मुंबईदि. १२ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्याकॉर्पोरेट संस्थाउद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये १७ हजार १५० बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टलऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्याकॉर्पोरेट संस्थाउद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलेतर चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबरअखेर १ लाख २८ हजार २३३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहेअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

             श्री. मलिक म्हणाले कीबेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षणकौशल्येअनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्याउद्योजककॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

            विभागाकडेमहास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ४७६ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहेअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

मुंबईत सप्टेंबरमध्ये १० हजार ०२० बेरोजगारांना रोजगार

            कौशल विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले कीमाहे सप्टेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ४६ हजार १५० इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १२ हजार ५९४नाशिक विभागात ६ हजार ४४९पुणे विभागात १२ हजार ८६२औरंगाबाद विभागात ५ हजार ९८१अमरावती विभागात २ हजार ९५३ तर नागपूर विभागात ५ हजार ३११ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १७ हजार १५० उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक १० हजार ०२०नाशिक विभागात १ हजार ७६०पुणे विभागात २ हजार ५०५औरंगाबाद विभागात २९८अमरावती विभागात ५२८ तर नागपूर विभागात २ हजार ०३९ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

No comments