महापालिकेच्यावतीने 1450 दिव्यांग व 70 कुष्ठरोगी यांना दिपावलीपूर्व अनुदान वाटप
कोल्हापूर ता.03 – महानगरपालिकेच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शहरातील नोदणीकृत पात्र 1450 दिव्यांगाना दरमहा रु.500 प्रमाणे सहा महिन्याचे प्रत्येकी रु.3 हजार प्रमाणे 43 लाख पन्नास हजार वाटप करण्यात आले. तसेच 70 कुष्ठरोगी यांना दरमहा रु.1500 प्रमाणे सहा महिन्याचे प्रत्येकी 9 हजार प्रमाणे 6 लाख 30 हजार इतकी वाटप करण्यात आली. दिवाळीपुर्वी मंगळवारी त्यांचे खातेवर ही रक्कम जमा करण्यात आली.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिव्यांग व कुष्ठरोग्यांची दिवाळी गोड होण्यासाठी विषेश प्रयत्न करुण निधी उपलब्ध करुन दिल्याबददल बुधवारी दिव्यांग बांधवानी त्यांचा महापालिकेच्या कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात पुष्पगुच्छ देऊन व पेढे वाटून अभिनंदन केले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही यावेळी सर्व दिव्यांगांना पेढे वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अजित शिंदे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
No comments