Header Ads

Header ADS

शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघ आदर्श मॉडेल बनवू -- जि. प. सदस्या रसिका पाटील*.


बालिंगा /प्रतिनिधी*
       शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघ आदर्श मतदार संघ बनविणार असे गौरउदगार शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या व अर्थ, शिक्षण व क्रिडा सभापती रसिका अमर पाटील. यांनी काढले.
       बालिंगा. ता. करवीर. येथे रसिका अमर पाटील. यांनी आपल्या फंडातून एक कोटी सात लाख निधीच्या विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. बालिंगा गावचे सरपंच मयूर जांभळे,उपसरपंच पंकज कांबळे,माजी सरपंच अनिल पोवार, माजी उपसरपंच श्रीकांत भवड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष  मधुकर जांभळे. यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
      यावेळी बालिंगा ते रिंगरोड रस्ता 48 लाख,गावांतर्गत रस्ता 15 लाख , महेश्वर कॉलनी रस्ता 5 लाख , कोर्ट कॉलनी  येथे पाईप लाई न 10 लाख,आरोग्य केंद्र दुरुस्ती 10 लाख,महादेव मंदिर पोच रस्ता  5 लाख,हायमास्ट दिवे.4 लाख. हरिजन वसाहत रस्ता.10 लाख. आदी विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.
           रसिका पाटील पुढे म्हणाल्या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघाने अपक्ष निवडून देऊन या मतदार संघाची सेवा करण्याची संधी दिली. या मतदारांच्या आशीर्वादाने आमचे नेते पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील. व्ही. बी. पाटील. यांनी मला अर्थ, शिक्षण व क्रिडा सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच मी या मतदार संघात विकासासाठी निधी आणू शकले असे सांगून भविष्यात शिक्षणाला महत्व देऊन शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे यावेळी त्यानी सांगितले.
    या कार्यक्रमास अमर पाटील. मधुकर जांभळे, अनिल पोवार, श्रीकांत भवड, सरपंच मयूर जांभळे,उपसरपंच पंकज कांबळे,ग्रा. पं.सदस्य नंदकुमार जांभळे, अजय भवड, पांडुरंग वाडकर, धंनजय ढेंगे, कृष्णात माळी, प्रकाश जांभळे, विजय जांभळे, अजित कांबळे, संदीप सुतार, विकास जांभळेआदिसह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

No comments