शहरातील सात बंदिस्त पार्किंगवर महापालिकेची कारवाई
कोल्हापूर ता.17 : राजारामपुरी व शहरातील इतर परिसरातील काही पार्किंगमध्ये बांधकामे करुन पार्किंग बंदीस्त केलेली होती. यापार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग न झाल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत होता. यामुळे महापालिकेच्या नगररचना विभाग, विभागीय कार्यालय 1,2,3,4, अतिक्रमण, इस्टेट, विद्युत व यांत्रीकी विभाग यांनी 7 बंदीस्त पार्किंगवर संयुक्त कारवाई केली. हि कारवाई राजारामपूरी, महालक्ष्मी मंदिर परिसर, महाद्वाररोड, ताराबाई रोड या ठिकाणी करण्यात आली. यावेळी बंदीस्त पार्किंग जेसीबी, कटरव्दारे पार्किेंग खुली करण्यात आली.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हि कारवाई उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, नंदकुमार पाटील, बाबुराव दबडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, सुनिल भाईक, चेतन भारमल, अक्षय आटकर, मयुरी पटेवगार, गुंजन भारंबे, विवेक चव्हाण, उमेश बागुल, प्रमोद बराले, सागर शिंदे, अवधूत नेर्लेकर, सतिश फप्पे यांनी केली.
सदरची कारवाई गुरुवार दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी अशीच चालू राहणार असून काही बंदीस्त पार्किंग व शहरातील नालापात्रात अतिक्रमण करुन केलेली बांधकामे निष्कासीत करण्याची कारवाई सुरु राहणार आहे. तरी संबंधीत नागरीकांनी नाल्याचे पात्रात भरावा टाकून केलेली बांधकामे व पार्किंग बंदीस्त करुन केलेली अनाधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घ्यावीत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
No comments