Header Ads

Header ADS

आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ग्रामसेवक संवर्गाचा एक दिवसीय संप

 बालिंगा / प्रतिनिधी
        औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाठ यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सरपंच मेळाव्यात राज्यातील ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपशब्द वापरून अवमाणित केलेआहे . शासनाच्या विविध योजना सर्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचं प्रामाणिकपणे काम ग्रामसेवक संवर्ग करीत असतो आणि आहे. सरपंच आणि ग्रामसेवक ही विकासाच्या रथाची दोन चाके आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच गावाचा कारभार चालतो असं असताना आहे. आमदार शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपशब्द वापरून ग्रामसेवक संवर्ग आणि सरपंच व सदस्य यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचं काम केले आहे.याचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यात एकदिवसीय संप करून आमदार शिरसाठ यांचा निषेध करण्यात आला.
     महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई.136शाखा करवीर आणि कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियन शाखा करवीर  यांच्या वतीने  करवीर पंचायत समिती येथे एकदिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियन डी. एन. ई.136 चे जिल्हा अध्यक्ष एन. के. कुंभार. यांनी करवीर पंचायत समिती येथे आंदोलन स्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
     यावेळी करवीरच्या सभापती मंगल पाटील, व करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले. यांना निवेदन देण्यात आले.
   या आंदोलनास  करवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल पाटील, माजी सभापती अश्विनी धोत्रे, सदस्य प्रदिप झांबरे. चंद्रकांत पाटील,माजी उपसभापती सागर पाटील,सविता पाटील,राजमाने मॅडम, कटेजा मॅडम यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला.तसेच ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संदेश भोईटे,शिवानंद कोचरी, विजय नलवडे, लिपिक संघटना अध्यक्ष अनिल पाटील, राहूल यादव, कृषी अधिकारी टी.बी. पाटील. यांनी पाठींबा दिला.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई.136 करवीर तालुका अध्यक्ष अभिजित चौगले, सचिव दतात्रय धनगर व कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष एस. डी. पाटील, करवीर तालुका अध्यक्ष मारुती पाटील, सचिव संदीप पाटील. यांनी काम बंद आंदोलन करण्या मागची पार्श्वभूमी सांगितली.
     आंदोलनात  काकासाहेब पाटील, आर, डी. कुंभार,  अशोक मुसळे, सम्राट रानगे,सुरेश शेंडगे, संदीप पाटील दिलीप तेलवी,विलास राबाडे, सागर पोवार,उत्तम पाटील,विजय माळी, शिवाजी वाडकर,मनीषा निकम, तबसूम अत्तार, सारिका बंडगर, रुपाली पोवाळकर, दिपा यादव आदिसह करवीर तालुक्यातील  सर्व ग्रामसेवक संवर्ग सहभागी झाला होता.

ग्रामसेवकांच्या व्यथा शासन दरबारी मांडू

औरंगाबाद येथील आ संजय शिरसाठ यांनी दि ८/११/२०२१ रोजी औरंगाबाद येथील सरपंच मेळाव्यात ग्रामसेवका बद्दल अपशब्द वापरल्या बद्दल कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियन च्या वतीने एकदिवशीय काम बंद आंदोलन व निषेध करण्यात आला या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व पंचायती समोर ग्रामसेवकांनी एकत्र येऊन बी डी ओ ना निवेदन देणेत आले तर जिल्हा संघटनेच्या वतीने मा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयसिंह चव्हाण. यांना निवेदन देणेत आले साहेबांनी या बाबत तात्काळ निवेदनावर शेरा मारून शासन दरबारी ग्रामसेवकाच्या व्यथा पाठवण्याबाबत सबधीताना सूचना दिल्या याप्रसंगी  एन के कुंभार. आर डी कुंभार. शिवाजी वाडकर श्री अभिजित चोगले. विरेंद्र मगदूम.  अशोक मुसळे इ उपस्थित होते

No comments