Header Ads

Header ADS

मालमत्ता कर आकारणीच्या विशेष कॅम्पमध्ये नांवे हस्तांतराची 46 प्रकरणे व नविन कर आकारणी 6 प्रकरणे मंजूर


कोल्हापूर ता.14 : ए.बी.सी.डी व ई वॉर्डमधील खुल्या जागा व इमारतींना मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विभागीय कार्यालय वाईज दि. 13 ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॅम्पमध्ये विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत नांवे हस्तांतराची 46 प्रकरणे व नविन कर आकारणी 3 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, प्र.कर अधिक्षक विलास साळोंखे उपस्थित होते.

या कॅम्पमध्ये मंगळवारी नाव हस्तांतरणाची 42 प्रलंबीत कामे निर्गत केली असून नविन कर आकारणी प्रलंबीत 3 कामापैकी 3 कामे निर्गत करण्यात आली. या कॅम्पमध्ये समक्ष दाखल झालेल्या कामापैकी नाव हस्तांतरणची 4 कामे दाखल झाली. ती सर्व कामे निर्गत करण्यात आली. तर नविन कर आकारणी करणेसाठी 3 कामे दाखल झाली होती. यामध्ये 1 का प्रकरणाची अपूरी कागदपत्रे असलेने ती पुर्तता करण्यासाठी जागेवरच संबंधीतांना नोटीस देण्यात आली.

बुधवार, दि.15 डिसेंबर 2021 रोजी राजारामपूरी विभागीय कार्यालय अंतर्गत सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राजारामपूरी बागल मार्केट येथील घरफाळा कार्यालयात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नागरीकांनी कर आकारणी करणेसाठी प्रॉपटीकार्ड, सातबारा उतारा, इंडेक्स उतारा, सेलडीड, कब्जेपट्टी, झोपडपट्टी कार्ड, बांधकाम परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, प्रथम लाईट बिल, अपार्टमेंट असलेस बिल्डर, डेव्हलपर यांचे पूर्ण नांव  पत्ता याबाबतची कागदपत्रे घेऊन यावीत. ज्या मिळकतींना यापूर्वी कराचे देयक येत होते परंतु आता येत नाही अशा मिळकतधारकांनी देयकाची छायाकिंत प्रत  कर भरणा केलेल्या पावतीची छायाकिंत प्रत अर्जासोबत सादर करावीत असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments