Header Ads

Header ADS

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ



            कोल्हापूर, दि. 01 :  भारत निवडणूक आयोगाने
दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार
यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021
या कालावधीत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने घोषित केले होते. तथापी या कार्यक्रमास दि. 5 डिसेंबर 2021 अखेर मुदतवाढ दिली असून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी  दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत, असे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी कळविले आहे.

            दावे व हरकती निकालात काढणे- दि. 20 डिसेंबर पर्यंत तर मतदार
यादीची अंतिम प्रसिध्दी- दि. 5 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

 00 0 0 0 0 0

No comments