बालिंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण वसंतराव जांभळे
बालिंगा / प्रतिनिधी.
कोरोना आजार समूळनष्ट करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. असे मत बालिंगे हायस्कूल बालिंगे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जांभळे यांनी व्यक्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे अंतर्गत बालिंगे आरोग्य उपकेंद्रा मार्फत आयोजित इयत्ता 8 वी. ते.10 वी. च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या नियोजन कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सरपंच मयूर जांभळे.उपसरपंच पंकज कांबळे. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.8 वी. ते.10 वी. च्या वर्गातील 138 विध्यार्थी व गावातील नागरिक असे 140 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य रंगराव वाडकर, संदीप सुतार,विजय जांभळे, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खलीपे, डॉ. गुरव मॅडम, डॉ. श्वेता शेट्टीश्रीमती छाया चिले,अजित पाटील ,मेघा चौगले,बी. ए. कांबळे,श्रीमती प्रियांका पाटील,ए.एम.करलकर,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाप, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
No comments