Header Ads

Header ADS

शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील 1164 विद्यार्थांचे लसीकरण पुर्णहेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील व्याधिग्रस्त 518 नागरिकांना प्रिकॉशन डोस


कोल्हापूर ता. 19 : शहरामध्ये महाविद्यालय व शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील 1164 विद्यार्थांचे  लसीकरण करण्यात आले. बुधवारी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये शहरातील 8 महाविद्यालय, शाळा व महापालिकेच्या 1 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ही विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली. तर प्रिकॉशन डोसमध्ये‍ हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील व्याधिग्रस्त 518 नागरिकांना हा प्रिकॉशन डोस देण्यात आला आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर 99, फ्रंट लाईन वर्कर 56 व 60 वर्षावरील 363 व्याधिग्रस्त नागरीकांना प्रिकॉशन डोस देण्यात आला.

            बुधवारी शहरामध्ये महाविद्यालय व शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील 1164 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले. सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये शहरातील 8 महाविद्यालय व एका प्राथमिक नागरी केंद्रामध्ये हे विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आले. यामध्ये प्रिंसेस इंदुमतीदेवी हायस्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये 212, कोल्हापूर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 140, देशभूषण विद्यामंदीर हायस्कूलमध्ये 119, विक्रम हायस्कूलमध्ये 30, सेवेंथ डे इंग्लिश स्कूलमध्ये 163, आरके वालावलकर प्रशालामध्ये 74, आयटीआय कॉलेजमध्ये 340, रॉयल इंग्लिश स्कूलमध्ये 78 व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फुलेवाडी येथे 8 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले.

          गुरुवार दि.20 जानेवारी 2022 रोजी मोहम्मद अब्दुल कलाम आझाद उर्दु माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, विक्रम हायस्कूल, एम.एस.पटेल इंग्लिश मेडियम स्कूल येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 8 ते रात्री 9 यावेळेत सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात 18 वर्षावरील नागरीकांना कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीता ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.

शहरात 2166 नागरीकांचे लसीकरण

महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 2166 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्‍ये हेल्थ केअर वकर्स 122, फ्रंन्टलाईन वर्कर्स 53 तर 15 ते 18 वर्षापर्यंत 663, 18 ते 45 वर्षापर्यंत 882 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. तर 45 ते 60 वर्षापर्यंत 254 नागरीकांचे व 60 वर्षावरील 192 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 6,82,853 आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स व नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

No comments