मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता
कोल्हापूर, दि.29 : कोल्हापूर विमानतळावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत १४ जानेवारीला मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. या पंधरवड्यात मराठी विषयक व्याख्यान, निबंधलेखन आणि कविता वाचन यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.
"लाखो करोडो रुपये खर्च करून भाषा मोठी होत नसते तर ती बोलती ठेवल्याने भाषा मोठी होते" अशाप्रकारचं व्याख्यान शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी करुन उपस्थित श्रोत्यांना मराठी भाषा आणि तिचं महत्व पटवून दिल. मराठी भाषेविषयी केलेलं व्याख्यान हे या पंधरवड्याच मुख्य आकर्षण ठरलं. तसेच या दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध आणि कविता स्पर्धेत दोन मुस्लिम बांधव कर्मचाऱ्यांनी बाजी मारली.
विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन आणि आयोजकांचे आभार मानून या पंधरवड्याची दिनांक आज सांगता करण्यात आली.
No comments