Header Ads

Header ADS

एक आठवण....कै. सिंधुताई ऊर्फ माई


एक आठवण....
कै. सिंधुताई ऊर्फ माई यांचेशी एका कार्यक्रमात येथील शिवाजीपेठेतील समाजसेवक माजी महापौर कै. भिकशेठ पाटील (अण्णा) यांची भेट झाली..कार्यक्रमासाठी त्या महालक्ष्मी धर्मशाळेमधे राहिल्या होत्या...अण्णांना ते समजले.. त्यांनी  माईंना आग्रहाने आपल्या घरी (गा चा वाडा ,मरगाई गल्ली , शिवाजीपेठ) येथे नेले..व कोल्हापूरात आलात की बाहेर कुठंही रहायचे नाही... इथेच रहायचे घर भावाचे आहे असा प्रेमळ धाक दाखवला... माईपण जेंव्हा कोल्हापूरला यायच्या तेंव्हा अण्णांकडे रहायच्या...अण्णांच्या पत्नी  श्रीमती रत्नप्रभा (काकी) यांचा विशेष स्नेह जडला.. तसेच शेजारील मेंगाणे आजी , सरलामामी, बेबी मावशी वगैरे या अक्षरशः माईंच्या बहीणी झाल्या... मी एकदा  मामाकडे गेलो होतो आणी माई बाहेरील सोप्यात सरला मामीं बरोबर बोलत बसल्या होत्या त्यांनी माझी ओळख माईंना करुन दीली.. माईंनी पाठीवर हात ठेवला व खूप शिक , मोठा हो असा आशीर्वाद दिला..पूढे आठ दिवस मी माईंना भेटायला जायचो.. फारच सुंदर , मार्मिक बोलायच्या..तसाच बोलण्यात धाक ही होता... कालच्या दुर्दैवी घटनेमुळे गतसृति चाळवल्या.. अतिशय वाईट  वाटले... माझी आई जाऊन दोन वर्षे झाली तीतकीच चुटपुट कालचे घटनेने लागून राहीली... कै. भिकशेठ अण्णांचा मुलगा धनंजय शी बोललो.. बऱ्याच आठवणी निघाल्या....त्याने  माईंसोबत चा काकींचा व मामींचा फोटो पाठवला..तो ईथे पोस्ट करत आहे... ति. माईंना भावपूर्ण श्रद्धांजली ...

समाज सेवक कै. भिकशेठ पाटील (अण्णा ) यांच्या शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतील राहत्या निवासस्थानी सण 1985 दरम्यानच्या छायाचित्रात सिंधुताई सपकाळ यांचे सोबत डावीकडून संगीता अंबपकर, श्रीमती रत्नप्रभा भिकशेठ पाटील, स्वर्गीय श्रीमती सावित्री मेंगाणे, स्वर्गीय सरलाताई नारायण पडवळे, सुजाता शिंदे-मगदूम, राहुल शिंदे, दिपाली शिंदे, अभिजीत पाटील आदी दिसत आहेत..

No comments