Header Ads

Header ADS

खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा साठा करुन ठेवा -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे


कोल्हापूर दि. 24 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दजन्य परिस्थितीमुळे जागतिक खत बाजारात रासायनिक खत तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खताच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सद्या बाजारात पुरेशा प्रमाणात खत साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
भारत सर्वाधिक खतांची आयात करणारा देश असून युध्दजन्य परिस्थितीत देशात ऐन खरीप हंगामात रासायनिक खताची टंचाई भासू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ताच शक्य असेल तेवढी खत खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000

No comments