*सरपंचानी स्वतःला मिळणाऱ्या मानधनातून ग्रामपंचातीच्या ५० कर्मचाऱ्यांना करून दिला तिरुपती बालाजीला मोफत विमान प्रवास*
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उचगाव गावातील सरपंचानी स्वतःला मिळणाऱ्या मानधनातून ग्रामपंचातीच्या ५० कर्मचाऱ्यांना तिरुपती बालाजीला मोफत विमान प्रवास करून दिला आहे. सरपंच मानधनातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करून देऊन देशात एक आदर्श घडवला आहे.
लोकनियुक्त सरपंच मालुताई काळे आणि माजी सरपंच गणेश काळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
आपले गाव स्वच्छ राहावे, आपले गाव आदर्श राहावे यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी काम करत असतात. मात्र, त्यांना मिळणाऱ्या मानधनातून विमान प्रवास करने त्यांना शक्य नाही. पण या कर्मचाऱ्यांचे विमान प्रवासाचे स्वपन पूर्ण केले आहे करवीर तालुक्यातील उचगाव गावच्या सरपंचांनी.
केवळ आकाशात आणि स्वप्नातच विमान पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष विमानातुन प्रवास होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर ती उत्सुकता तो आनंद जाणवत होता. त्यांच्या घरचे नातेवाईक त्यांना विमानतळावर निरोप द्यायला आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ही तो आनंद दिसत होता. सरपंचाच्या या कामाचे कौतुक गावकऱ्यांकडून होत आहे. यावेळी माजी सरपंच गणेश काळे, मधुकर चव्हाण, दिपक रेडेकर, दिनकर पोवार, राजू काळे, रवी काळे, सुरेश चव्हण आदी उपस्थित होते.
No comments