Header Ads

Header ADS

ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शनामध्येमोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


 
कोल्हापूर, दि. 8 : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति-शताब्दी निमित्त जिल्ह्यात लोकराजा कृतज्ञता पर्व भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवार दि. २८ ते शनिवार दि. 30 एप्रिल 2022 या तीन दिवसांच्या कालावधीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जास्तीत-जास्त प्रकाशक व ग्रंथ विक्रेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
ग्रंथ प्रदर्शनामध्ये राज्यातील व राज्याबाहेरील शासकीय व इतर प्रकाशनाचे पुस्तक/ ग्रंथांचे स्टॉल श्री शाहू छत्रपती मिल आवार, बागल चौक, कोल्हापूर येथे लावण्यात येणार आहेत.  प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांनी आपल्या पुस्तक/ग्रंथांचा स्टॉल श्रीमती अपर्णा वाईकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कोल्हापूर ई-मेल diokolhapur.dol@maharashtra.gov.in aparnawaikar@gmail.com व भ्रमणध्वनी क्र. ८८८८८१५३२६ व डॉ. प्रकाश बिलावर, उपग्रंथपाल, बॅ.बा.ख.ज्ञान स्त्रोत केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ई-मेल subbkl@unishivaji.ac.in भ्रमणध्वनी क्र. ९४२३२९०३०२, दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६०९४२१ यांच्याशी संपर्क करुन दिनांक १८ एप्रिल पर्यंत आरक्षित करावा, असे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
00000

No comments