Header Ads

Header ADS

महापालिकेचे जल अभियंता अजय साळोंखे वयोमानानुसार सेवानिवृत्त


कोल्हापूर ता.29 : महानगरपालिकेचे जल अभियंता अजय साळोंखे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शहर पाणी पुरवठा विभागात करण्यात आला. अजय साळोंखे हे सन 1984 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र शासनाकडे शाखा अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. 1984 ते 1993 अखेर सावंतवाडी कणकवली जिल्हा सिंधुदूर्ग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे शाखा अभियंता म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. 1993 ते 1996 अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा येथे शाखा अभियंता म्हणून कामकाज पाहिले. 1996 ते 1999 साली इस्लामपूर जिल्हा सांगली येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे शाखा अभियंता म्हणून कामकाज पाहिले. 1999 ते 2004 साली कोल्हापूर महानगरपालिका येथे संपूर्ण  वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भाग वितरण व्यवस्थेचे कामकाज पाहिले. सन 2004 ते 2008 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोल्हापूर येथे कामकाज पाहिले. सन 2008 ते 2010 मध्ये कोल्हापूर महानगरपालिका ए, बी, सी, डी वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भाग वितरण व्यवस्थेचे कामकाज पाहिले. सन 2010 ते 2016 साली कोल्हापूर महानगरपालिकेकडे काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, युआयडीएसएसएमटी प्रकल्प विभागाकडील कामकाज पाहिले. सन 2016 ते 2020 अखेर इचलकरंजी नगरपालिकेकडील जल अभियंता म्हणून काम पाहिले. सन 2021 ते 2022 अखेर महानगरपालिकेकडे जल अभियंता म्हणून काम पाहून ते सेवानिवृत्त होत आहेत.

या सत्कार प्रसंगी प्रकल्प जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपजल अभियंता रावसाहेब चव्हाण, राजेंद्र हुजरे, पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments