Header Ads

Header ADS

छ शिवाजी व छ ताराराणी रथोत्सवा पासून लोकराजा शाहु कृतज्ञता पर्वाची सुरवात




कोल्हापूर दिनांक १६
राजर्षी शाहू महाराजांच्या  स्मृती शताब्दीचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या ज्योतिबा यात्रेनंतर महालक्ष्मी रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी व छत्रपती ताराराणी  यांचा रथ उत्सव ज्योतिबा यात्रेत येणाऱ्या भाविकांना आपला इतिहास आणि पूर्वजांचे कार्यओळख , स्मरण हवे व्हावे यासाठी रथोत्सवाची सुरुवात केली होती. हीच परंपरा आज ही सुरू आहे.  
लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व आयोजित करताना दिनांक १८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता जुना राजवाडा ,भवानी मंडप येथून  सुरुवात होणार आहे.
श्रीमंत शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील , खासदार संभाजी छत्रपती ,  मालोजी छत्रपती, नाम. हसन मुश्रीफ,  नामदार राजेंद्र पाटील यांच्या सह  लोकप्रतिनिधी, तालीम, मंडळे, विविध सामाजिक संस्था - संघटनांचे  कार्यकर्ते आणि कोल्हापूरचे नागरिक यांच्या उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वात दिनांक 18 पासून एप्रिल पासून 22 मी पर्यंत होणाऱ्या सर्व उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

No comments