संस्थेची निवडणूक कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक युनियन डि.एन. ई.136 स्वबळावर लढवणार .....अध्यक्ष. एन. के. कुंभार
बालिंगा /प्रतिनिधी .
कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक सहकार पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडून प्रसिद्ध झाली असून अंतिम मतदार यादी हरकती स्विकारन्याच्या दिनांकापासून 15 दिवसानंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक संघटना D. N. E.136 संघटनेच्या बॅनरखाली स्वबळावर निवडणूक लढविणार असलेचे अध्यक्ष एन. के. कुंभार. यांनी सांगितले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संघटनेने सत्तांतर घडवून सभासदांभिमुख काम केले आहे. पुढील काळातही नवनवीन संकल्पना राबवून संस्था स्वबळावर सभासदांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. निवडणुकीसाठी संघटनेच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येऊन निवडणूकीस सामोरे जाण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष एन. के .कुंभार, सचिव के. टी.सिताफ,गौतम कांबळे, आर. डी.कुंभार, बी. डी.पाटील, चेअरमन रंगराव बोडके, जिल्हा संघटना व तालुका संघटना सर्व प्रतिनिधी, संस्था संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments