Header Ads

Header ADS

परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 19  : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुलां-मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेतंर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये निवडीसाठी अर्ज करण्यास दि.20 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचे अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे 1 यांच्याकडे दि. 20 जुलै रोजी सायं.6 वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

 योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखाच्या आत असावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत QS World University Ranking 200 च्या आतील असावी. अन्य अटी व शर्ती सविस्तर जाहीरातीमध्ये तसेच विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2018 मध्ये नमुद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमुना शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंक ला भेट द्यावी, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

No comments