*आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा* *-जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन*
कोल्हापूर, दि.7(जिमाका): जिल्ह्यात ८ जुलै २०२२ पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
*आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून यासाठीचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.*
*०२३१-२६५९२३२,*
*०२३१-२६५२९५०,*
*०२३१-२६५२९५३,* *०२३१-२६५२९५४*
*टोल फ्री क्रमांक १०७७*
********
No comments