Header Ads

Header ADS

भात, ज्वारी, नाचणी, भुईमुग,सोयाबीन पिकांसाठीपीक विमा योजना लागू


कोल्हापूर, दि.21  :  चालू खरीप हंगामातील भात, खरीप ज्वारी, नाचणी, भुईमुग आणि सोयाबीन या पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.
            दि. 1 जुलै 2022  पासून राज्यात अधिसूचित क्षेत्रातील खरीप हंगामातील.  प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी असून  शेतकऱ्यांना विमा सहभागासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 व 8 अ चा उतारा, बॅंक पासबुक झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स व स्वयंघोषणापत्र इ. प्रकारची कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सर्व संबंधीत विमा कंपनी प्रतिनिधी, वित्तीय संस्था, ग्रामस्तरावरील कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा.
खरीप ज्वारीसाठी पिकासाठी  प्रती हेक्टरी 27 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 540 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. नाचणी पिकासाठी प्रती हेक्टरी  20 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. भूईमूग पिकासाठी प्रती हेक्टरी  38 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 760 रुपये विमा हप्ता भरावा लागेल आणि सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टरी  49000 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 980 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.
 
00000

No comments