Header Ads

Header ADS

*विमानतळ विस्तारीकरण: मौजे मुडशिंगी येथील जमीन संपादनाची कार्यवाही सुरु**113 बाधित खातेदार जमीन खरेदी देण्यास सहमत*



कोल्हापूर, दि.26  : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी करवीर तालुक्यातील मौजे मुडशिंगी येथील क्षेत्र 25.99.20 हेक्टर आर चौरस मीटर जमीन संपादनाची कार्यवाही सुरु आहे. मौजे मुडशिंगी येथील बाधित खातेदारांसोबत करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी मौजे मुडशिंगी येथील खातेदारांसोबत बैठका झाल्या असून खाजगी जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यासाठी सकारात्मक चर्चा होवून 113 बाधित खातेदारांनी त्यांची जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी खरेदी देण्यासाठी सहमती दिली आहे. त्याचे एकूण क्षेत्र 4.78.00 हेक्टर आर इतके आहे.

 विमानतळ विस्तारीकरणासाठी उर्वरित खातेदारांनी जमीन खरेदी देण्यासाठी संमतीपत्र द्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. उर्वरित जमीन मालकांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून जमीन खरेदी करण चर्चा करुन आपली संमतीपत्रे जमा केली तर तात्काळ जिल्हा स्तरीय समितीची बैठक घेवून जमीनीचे मुल्यांकन निश्चिती लवकरात लवकर होईल, जेणेकरून वाटाघाटीने थेट खरेदीची प्रक्रिया गतीने पार पडेल. उपविभागीय अधिकारी, करवीर या कार्यालयात जमीन मालकांनी संमतीपत्रे द्यावीत. त्या ठिकाणी त्यांना लागणारी कागदपत्रे व उचित मार्गदर्शन करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.
000000

No comments