Header Ads

Header ADS

कंजारभाट समाजात हर घर तिरंगा विधवा महिलेच्या हस्ते डौलाने फडकविण्यात आला


     

 बालिंगा./वार्ताहर. 
           शासनाच्या आदेशानुसार हर घर तिरंगा मोहीम सर्वत्र  राबविण्यात आली. सर्वांनी तिरंगा लावला.यामध्ये कंजारभाट समाजानेही आपला सहभाग घेतला. महेंद्र विलास गागडे , पंचायत समिती करवीरचे कर्मचारी यांनी करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे राहते घरी नियमांचे पालन करून रितसर झेंडावंदन कार्यक्रम केला . यामध्ये कंजारभाट समाजामध्ये विधवा प्रथा अल्प प्रमाणात असूनही श्रीमती बबीता बागडे. या विधवा महिलेच्या हस्ते झेंडावंदन करून विधवा प्रथेला एक चांगला संदेश दिला आहे . महेंद्र गागडे यांनी आपल्या दारात 75 व्या. अमृत महोत्सव दिनाच्या बॅनरसह फूले , रांगोळी इत्यादींनी सजावट करून गावातील प्रतिष्टीत व्यक्ती  प्रकाश पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी झेंडा वंदनाचा कार्यक्रम राबवून घरोघरी झेंडा उभारण्याचे महत्व वाढविले आहे .यावेळी प्रकाश पाटील, राहुल बागडे, सपना गागडे, दर्शना बागडे,कुमार बागडे,  रोपन गागडे. आदी उपस्थित होते.

No comments