*शाहूवाडी - पन्हाळ्यातील रस्त्यांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर).
*महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै बजेट मध्ये शाहूवाडी तालुक्याकरिता राज्यमार्ग करिता ४ कोटी ५५ लाख व प्रमुख जिल्हा मार्गकरिता २५ कोटी ०५ लाख असा रस्ते रुंदीकरण, सुधारणा व पुल बांधणे या कामांकरिता तर पन्हाळा तालुक्यातील राज्यमार्ग करिता १० कोटी ७५ लाख व प्रमुख जिल्हा मार्गकरिता १४ कोटी असा रस्ते रुंदीकरण, सुधारणा व पूल बांधणे या कामाकरिता एकूण शाहूवाडी तालुक्यासाठी २९ कोटी ६० लाख व पन्हाळा तालुक्यासाठी २० कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे...*
*शाहूवाडी - पन्हाळा या दोन्ही तालुक्यातील विविध रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण अथवा मजबुतीकरणासह नूतनीकरणासाठी हा निधी मिळावा, यासाठी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी पाठपुरावा केला होता.रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेतर तरतुदीतून मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्यांना त्यात समाविष्ट करुन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला होता. या विभागाने ही मागणी मान्य करुन तब्बल ५० कोटी एवढा निधीही मंजूर केला आहे. अशी माहीती आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी दिली...*
*शाहूवाडी तालुक्यातील रस्ते खालीलप्रमाणे...* 🔻
रामा क्रमांक 191 ते नांदगाव घुंगुर खोतवाडी पिशवी बांबवडे सरूड ते सागाव जिल्हा हद्द रामा 397 किमी 8/900 ते 10/200 मध्ये संरक्षण भिंत व किमी 16/00 ते 22/00 मोरीचे बांधकाम करणे (ता.शाहुवाडी) - 1 कोटी
रामा क्रमांक 191 ते नांदगाव घुंगुर खोतवाडी पिशवी बांबवडे सरूड ते सागाव जिल्हा हद रामा 397 किमी 3/00 ते 4/00 व किमी 4/650 ते 5/800 मध्ये सुधारणा करणे व 3/600 ते 4/600 घुंगुर गावांमध्ये गटर्स बांधणे (ता.शाहुवाडी) - 90 लाख
रामा क्रमांक 191 ते नांदगाव घुंगुर खोतवाडी पिशवी बांबवडे सरूड ते सागाव जिल्हा हद रामा 397 किमी 17/00 ते 18/450 मध्ये रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता.शाहुवाडी) - 1 कोटी 75 लाख
रामा क्रमांक 150 पासून तुरुकवाडी गोंडोली सोंडोली शित्तूर तर्फ वारून उखळू रस्ता प्रजिमा 3 वर किमी 0/00 ते 4/00 ची रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता.शाहुवाडी) - 4 कोटी
रामा क्रमांक 150 पासून तुरुकवाडी गोंडोली सोंडोली शित्तूर तर्फ वारून उखळू रस्ता प्रजिमा 3 वर किमी 4/00 ते 10/00 ची रुंदीकरणासह सुधारणा करणे (ता.शाहुवाडी) - 4 कोटी
रा.म.मा 204 ते डोणोली चरण सैदापूर थेरगाव रस्ता प्रजिमा क्रमांक 6 किमी 2/00 ते 2/500 मध्ये भौमितिक सुधारणा मजबुतीकरण करणे (ता.शाहुवाडी) - 1 कोटी 10 लाख
No comments