पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर, दि. 23 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व संजय घोडावत, पॉलिटेक्निक, अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सं. कृ. माळी यांनी कळविले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील नामांकित खाजगी आस्थापनाकडील 850 पेक्षा जास्त रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून, मेळाव्यात 7 वी ते पदवीधर, पदव्यूत्तर पदवी उतीर्ण, आयटीआय, डिल्पोमा, इंजिनिअर, नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. मेळाव्यात अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई या कर्ज योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. रिक्त पदांची माहिती www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 0231-2545677 वर संपर्क साधावा.
No comments