Header Ads

Header ADS

ग्रामसेवक संघटना DNE 136 च्या करवीर तालुका अध्यक्षपदी गीतांजली वाईंगडे .यांची बिनविरोध निवड संघटनेच्या स्थापनेपासून अध्यक्ष पदावर महिला विराजमान होण्याची महाराष्ट्रातील पहिली घटना





    





  बालिंगा / प्रतिनिधी.
महाराष्ट्र  राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 च्या करवीर तालुका अध्यक्षपदी गीतांजली वाईंगडे.यांची तर सचिवपदी दत्तात्रय धनगर. यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसेवक संघटनेच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. 
  संघटनेचे पदाधिकारी काकासाहेब पाटील, गौतम कांबळे,अशोक मुसळे, राजेंद्र गाढवे, आर. डी.कुंभार, अजित राणे, एम. टी.मोरे, आदींच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली .
नुतन अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करवीरचे गटविकास अधिकारी  व्ही. व्ही.यादव. यांच्या हस्ते  सहाय्यक गटविकास अधिकारी  आर. एस. जाधव, विस्तार अधिकारी संदेश भोईटे,शिवानंद कोपरी, विजय नलवडे. यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
     निवडीवेळी अभिजित चौगले,सम्राट रानगे ,शिवाजी वाडकर, सचिन तारदाळे,निलेश कुंभार, प्रविण खराळकर, सुरेश  शेंडगे , पूनम कांबळे, गायत्री जाखलेकर, दिपा यादव, तब्बसुम अत्तार,सारिका बंडगर, आदिसह ग्रामसेवक युनियन DNE 136 चे सभासद उपस्थित होते.

No comments