जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करीत असलेल्या महिला समाज सेविकांना महिला व बाल विकास विभागाकडून सन 2013-14 ते 2019-20 या कालावधीतील जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन 2013-14 करिता प्रा.डॉ.रुपा शांतीलाल शहा, सन 2014-15 करिता अनिता अशोक पेडणेकर, सन 2015-16 करिता डॉ.स्वाती मंगेश काळे, व सन 2017-18 करिता प्रा. डॉ. अंजना सत्वशील जाधव यांना पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे.
पुरस्कार प्राप्त महिला समाज सेविकांचा शासनाच्या वतीने शाल, श्रीफळ, 10 हजार 1 हजार रुपयांचा धनाकर्ष, गौरव सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 1 मे 2023 रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शाहू स्टेडीयम, कोल्हापूर येथे होणार असून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.
No comments