दिव्यांग उमेदवारांसाठी 25 ऑगस्टला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
कोल्हापूर, दि. 23 : राज्य शासनाच्या वतीने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी महासैनिक दरबार हॉल, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता एक दिवसीय शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी दहावी, बारावी, आय.टी.आय तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना बायोडाटा सोबत आणणे आवश्यक असून, या संधीचा सर्व दिव्यांग उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.
000000
No comments