Header Ads

Header ADS

रविवारपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ 10 दिवस कोल्हापूरवासियांना विविध उपक्रमांची मेजवानी



कोल्हापूर : रविवार 11 ऑक्टोबर या दिवसापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. या महोत्सवाचे भवानी मंडप येथे सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.
                  यावेळी भवानी मंडप परिसरात शाहिरी पोवाडा,मर्दानी खेळ हे नामवंत कलावंतांकडून तर दसरा महोत्सवाबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती देणारे भाषण वक्त्याकडून सादर करण्यात येणार आहे .
      या नवरात्र महोत्सवात जिल्हा प्रशासनातर्फे 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूरवासियां साठी विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
              या महोत्सवातंर्गंत येत्या सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळां, महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनीं पालक,शिक्षक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.तसेच तरुणाईने या उपक्रमाचे विविध रिल्स बनवावेत.
गुरुवार ,15 ऑक्टोबर रोजी खास महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी या उपक्रमाच्या अनुषंगाने रिल्स बनवावेत आणि विविध समाज माध्यमांवर प्रसारित करावेत त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हे रिल्स शेअर करण्यासाठी लिंक बनविण्यात आली असून त्या लिंकवर हे विविध रिल्स पाठवावेत,जेणेकरून या शाही दसरा महोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती संपूर्ण राज्य किंबहुना देशभर होण्यास मदत होईल.
               रिल्सच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे बनवण्यात आलेली लिंक खाली दिली आहे .  Link https://forms.gle/e8RZGeaWJUSngPCQ8
              या लिंकवर संबंधितांनी रिल्स पाठवावेत असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments