आरोग्य विभागाच्यावतीने तिसऱ्या टप्यात 7175 घरांचे व 28364 लोकांचे सर्व्हेक्षण
कोल्हापूर : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नाग्रीकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्यात दि.18 मे 2020 रोजी 7175 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 28364 नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण आपटेनगर, सोमराज कॉम्प्लेक्स, दत्तोबानगर, दादू चौगुलेनगर, सुर्वेनगर, देवकर पाणंद, कत्यायनी कॉम्प्लेक्स, रामानंदनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, एस.एस.सी. बोर्ड, मोतीनगर, बावडा वसाहत, हरीओमनगर, न्यू कणेरकर नगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, कारंडे मळा, कदमवाडी, कावळा नाका, सदरबाजार, विचारे माळ, लाईनबाजार, शिवाजी पार्क, कसबा बावडा, रमणमळा, न्यू पॅलेस, शास्त्रीनगर, पांजरपोळ, राजारामपूरी, नार्वेकर मार्केट, शाहूनगर, तटाकडील तालीम, बाबुजमाल, साकोली कॉर्नर, वांगी बोळ, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, रुईकर कॉलनी, महाडिक कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या तिसऱ्या टप्यामध्ये आज अखेर 31190 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 130651 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.
No comments