आरोग्य विभागाच्यावतीने तिसऱ्या टप्यात 7550 घरांचे व 33221 लोकांचे सर्व्हेक्षण
कोल्हापूर : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पाʉर्ाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नाग्रीकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्यात दि.20 मे 2020 रोजी 7550 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 33221 नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण भोगम पार्क, हरिओम नगर, लक्षतीर्थ वसाहत, सरनाईक कॉलनी, जुना वाशीनाका, मरगाई गल्ली, राजघाट रोड, जोशीनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत, आयोध्या पार्क, नागाळा पार्क, देवकर पाणंद, महादेव नगर, गुलाबनगर, महाराष्ट्रनगर, जवाहरनगर, सिध्दार्थनगर, राजाबक्ष दर्गा, सदरबाजार, विचारेमाळ, कदमवाडी, पाटोळेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, रामानंदनगर, जरगनगर, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, बाजारगेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड परिसर या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या तिसऱ्या टप्यामध्ये आज अखेर 45976 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 198053 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.
No comments